राज्यात ओमायक्रॉनचे संकट वाढू लागल्यानंतर शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका झाली. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.
रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. यामुळे राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होत आहेत.