Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या

वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. अमर तुकाराम माळी(20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आईच्या साडीने गळफास लावून अमरने आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. मयत अमरते वडिल तुकाराम माळी हे एसटी कर्मचारी असून सध्या ते एसटी कर्मचारी संपात सहभागी आहेत.

अमरने बुधवारी सकाळी वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. मात्र दोन-तीन महिने झाले एसटी कर्मचारी संप सुरु असल्याने पगार नाही. त्यामुळे तुला कुठून पैसे देऊ असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर वडील आंदोलनाच्या ठिकाणी निघून गेले. अमरही घरातून बाहेर निघून गेला आणि दुपारी परत आला. अमर घरी आला तेव्हा त्याची आई आणि काकी जेवण करीत होत्या. आईने त्याला जेवणासाठी आग्रह केला. मात्र त्याने जेवणास नकार दिला आणि आराम करतो सांगून स्वतःच्या खोलीत निघून गेला.

बराच वेळ झाला तरी अमर खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे आई त्याच्या खोलीजवळ जाऊन आवाज देऊ लागली. तरीही त्याने दरवाजा उघडला नाही. मोठ्या भावानेही आवाज दिला. दरवाजा आतून बंद असल्याने मोठ्या भावाने शेवटी खिडकीतून डोकावून पाहिले असता अमर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश करीत अमरला खाली उतरवले. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमरने दयानंद महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -