Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकरवीर पोलिस ठाण्याचे कामकाज शहरात; मात्र कार्यक्षेत्र शहराबाहेर

करवीर पोलिस ठाण्याचे कामकाज शहरात; मात्र कार्यक्षेत्र शहराबाहेर

कामकाज कोल्हापूर शहरात आणि कार्यक्षेत्र मात्र शहराबाहेर असलेले करवीर पोलिस ठाणेही शहराबाहेर हलविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या प्रमुख वर्दळीचा मार्ग असलेल्या भाऊसिंगजी रोडवर या पोलिस ठाण्यामुळे गर्दीचा भार वाढत आहे. तो कमी करण्यासाठी करवीर पोलिस ठाणे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर तातडीने घेण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कार्यालयासह पोलिस, कोषागार, दुय्यम निबंधक अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये एकाच इमारतीत कार्यरत असतात. तालुक्यात येणार्‍या नागरिकांना महत्त्वाची कामे एकाच ठिकाणी करता यावीत, ही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची संकल्पना आजही अनेक तालुक्यांत कायम आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी प्रत्येक कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती होऊ लागल्या आहेत. त्याच पद्धतीने आता करवीर पोलिस ठाणेही स्वतंत्र होणे, त्याची इमारत शहराबाहेर होणे आवश्यक आहे.

तत्कालीन संकल्पनेनुसार करवीर पोलिस ठाणे करवीर तहसील कार्यालयाच्या इमारतीत आहे. कोल्हापूर शहराचा करवीर तालुक्यात समावेश आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांचा तहसील कार्यालयाशी संबध येतो. मात्र, कोल्हापूर शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणी आहेत. त्यांच्या आणि करवीर पोलिस ठाण्याचा कामकाजासाठी तसा संबंध येत नाही. केवळ तहसील इमारतीत या पोलिस ठाण्याचे अस्तित्व आहे, कामकाज मात्र संपूर्ण शहराबाहेर करावे लागते. हे वास्तव आता स्वीकारण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -