Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील सर्वात मोठा भिशी घोटाळा

राज्यातील सर्वात मोठा भिशी घोटाळा

राज्यातील सर्वात मोठा भिशी फसवणूक घोटाळा पुण्याच्या इंदापूरमध्ये झाल्याचा समोर आला आहे. इंदापूरमध्ये भिशीच्या नावाखाली 5 कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी इंदापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषाप्पा मारुती बंडगर, शंकर मारुती बंडगर, उत्तम मारुती बंडगर, नारायण सायबु वाघमोडे व परशुराम मारुती वाघमोडे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा घोटाळा 30 कोटीपर्यंतचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शहरांमध्ये याहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत संदीप चित्तरंजन पाटील यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -