कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारताने रेकॉर्ड ब्रेक लसीकरण मोहिम राबविली. त्याचा परिणाम ही दिसून आला. प्रतिकार क्षमता वाढल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाला काही प्रमाणात अटकाव करण्यात यश आले आहे. कोरोणाविरुद्धची ही लढाई अधिक प्रखर करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली असून लसीकरणात येणा-या तांत्रिक अडचणींचा निपटारा करण्याचा धडका आरोग्य मंत्रालयाने लावला आहे. दुर्गम भागापासून ते द-या खो-यात राहणा-यांना लस द्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांना को-विन पोर्टलवर (CoWin Portal) नोंदणीची परवानगी दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 4 सदस्यांपुरती मर्यादीत होती. मात्र ग्रामीण भागातील मोठ्या कुटुंबात केवळ एकाच मोबाईलचा वापर होतो. 4 सदस्यांची पूर्वीची मर्यादा अशा कुटुंबांसाठी अडचणी ठरत होती. सरकारने याविषयीचा बदल केला आहे.
लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी शक्कल; एकाच मोबाईल क्रमांकवरून करा 6 सदस्यांची नोंदणी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -