Wednesday, September 17, 2025
Homeब्रेकिंगWhatsapp Adminने वेळीच व्हा सावध, ग्रुपवर या चूका केल्यास जावे लागेल तुरुंगात!

Whatsapp Adminने वेळीच व्हा सावध, ग्रुपवर या चूका केल्यास जावे लागेल तुरुंगात!

इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप हे एकमेकांशी कनेक्ट राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याद्वारे तुम्ही मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉलद्वारे तुमच्या प्रियजनांशी नेहमी संपर्कात राहू शकता. पण व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वापरताना काही चुका झाल्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल खूप सतर्क आहे. यासोबतच कंपनी फेक न्यूजविरोधात अनेक कठोर पावले उचलत आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वापरतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेली कोणतीही चूक अ‍ॅडमिनला खूपच महागात पडू शकते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणत्याही धर्माचा अपमान करणारे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करणे आणि हिंसा भडकावणे देखील तुम्हाला अडचणीत आणू शकते. कोणत्याही धर्माची किंवा प्रार्थनास्थळाची हानी करण्यासाठी द्वेषयुक्त संदेश पसरवणे देखील चुकीचे आहे आणि यासाठी तुम्हाला अटक केली जाऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणताही देशविरोधी मजकूर शेअर करू नका. असे केल्याने कंटेंट शेअर करणाऱ्यासह ग्रुप अ‍ॅडमिनलाही अटक केली जाऊ शकते. तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ त्याच्या परवानगीशिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करू नका. असे करणे गुन्हा आहे. जर तुम्ही असे केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -