ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रसिद्ध पर्यावरणवादी (एनवायरमेंटलिस्ट) एरिक सोल्हेम (Erik Solheim) यांनी शनिवारी भारत आणि इतर देशांच्या इंटरनेट डेटावरील खर्चाची तुलना करताना सांगितले की, भारतात डेटावरील खर्च खूपच कमी आहे. एरिक यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर सांगितले की, भारतात 1 जीबी डेटासाठी (cost of 1 GB data) फक्त 0.09 डॉलर (जवळपास 7 रुपये) शुल्क आकारले जाते, जो सर्वात कमी डेटा खर्च (lowest data cost) आहे. याशिवाय, इस्रायलमध्ये 1 GB डेटासाठी 0.11 डॉलर आकारले जाते, जे 8.19 रुपयांच्या बरोबर आहे. त्याच वेळी, यूएस आणि कॅनडामध्ये 1 जीबी डेटाची किंमत अनुक्रमे 8 डॉलर (जवळपास 595 रुपये) आणि 12.55 डॉलर (जवळपास 933 रुपये) आहे.
एरिक सोल्हेम यांनी आपल्या ट्विटसह एक इमेज ग्राफ शेअर केला आहे ज्यामध्ये विविध देशांचा डेटा खर्च सांगितला आहे. इटलीमध्ये डेटाची किंमत 0.43 डॉलर प्रति जीबी आहे, म्हणजेच तेथील नागरिक 1 जीबी डेटासाठी 32 रुपये खर्च करतात. ग्रीसमध्ये 1 GB डेटासाठी 12.06 डॉलर (जवळपास 897 रुपये) आकारले जातात, तर दक्षिण कोरियामध्ये 10.94 डॉलर (जवळपास 814 रुपये) आकारले जातात.
एकंदरीत, जगभरात सेल फोनचा वापर वाढत आहे, तरीही डेटाची किंमत देशांनुसार मोठ्या प्रमाणात बदलते. सर्वात स्वस्त डेटा खर्च (भारत) आणि सर्वात महाग (मलावी) डेटाची किंमत यामध्ये 30,000% फरक आहे.
जगभरात 1 GB डेटाची सरासरी किंमत किती आहे ते जाणून घ्या…
सर्वात महाग मोबाइल डेटा असलेले टॉप 3 देश
मलावी – 27.41 डॉलर (जवळपास 2039 रुपये)
बेनिन – 27.22 डॉलर (जवळपास 2025 रुपये)
चाड – 23.33 डॉलर (जवळपास 1736 रुपये)
सर्वात स्वस्त मोबाइल डेटा असलेले टॉप 5 देश
भारत – 0.09 डॉलर (जवळपास 7 रुपये)
इस्रायल – 0.11 डॉलर (जवळपास 8 रुपये)
किर्गिझस्तान – $ 0.21 (जवळपास 15 रुपये)
इटली – 0.43 डॉलर (जवळपास 32 रुपये)
युक्रेन – 0.46 डॉलर (जवळपास 34 रुपये)
1 जीबी डेटासाठी बोत्सवानामधील नागरिकांना 13.87 डॉलर (जवळपास 1032 रुपये) मोजावे लागतात. तर येमेनमधील डेटा कॉस्ट 15.98 डॉलर (जवळपास 1189 रुपये) आणि बोलिव्हियामध्ये सरासरी डेटा खर्च 5 डॉलर (जवळपास 372 रुपये) आहे.
भारतात ब्रॉडबँड स्पीड वाढतोय
Ookla च्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने जारी केलेल्या डेटानुसार, जून 2021 मध्ये भारत फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत जगभरात 70 व्या क्रमांकावर होता. Ookla चा स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स दर महिन्याला जगभरातील इंटरनेट स्पीड डेटाची तुलना करतो. जून 2021 मध्ये भारताने इंटरनेट स्पीडमध्ये वाढ नोंदवली आणि मोबाइल डाउनलोड स्पीडच्या बाबतीत देशाचा 122 वा आणि ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत 70 वा क्रमांक आहे.
1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -