Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयककोरोना लसीकरणाबाबत BMCचा मोठा निर्णय, यापुढे दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण!

कोरोना लसीकरणाबाबत BMCचा मोठा निर्णय, यापुढे दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनाचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. मुंबई महानगर पालिकेने आता लसीकरणासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. यापुढे मुंबईमध्ये दोन शिफ्टमध्ये लसीकरण होणार आहे. याबाबतचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. यापुढे मुंबईत 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण दुपारी होईल. तर 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण (Vaccination) सकाळी केले जाईल.

मुंबई महानगर पालिकेने (BMC) यापुढे दोन शिफ्टमध्ये लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार लसीकरणाचे हे नवीन वेळापत्रक पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे. 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फारसा उत्साह पाहायला मिळत नाही. त्यामुळे या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला वेग देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने लसीकरण मोहीम दोन शिफ्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये 15 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले आहे. मुंबईत (Mumbai Corona Vaccination) या वयाच्या मुलांची संख्या 9 लाख 22 हजार 566 आहे. 18 जानेवारीपर्यंत यापैकी एकूण 1 लाख 77 हजार 614 लहान मुलांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. याचाच अर्थ लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या 20 टक्के मुलांनीच आतापर्यंत लस घेतली आहे. उर्वरीत मुलांचे लसीकरण अजूनही बाकी आहे. त्यांना पण लवकरात लवकर लस मिळावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेण्यासाठी बाकी राहिलेल्या मुलांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ‘लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई महानगर पालिका आता प्रत्येक शाळेच्या आवारात लसीकरण शिबिरे आयोजित करण्याची तयारी करत आहे. या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी खासगी संस्थांनीही पुढे येण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -