Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीAmit Shah यांनी निवडणूक आयोगाचे नियम बसवले धाब्यावर

Amit Shah यांनी निवडणूक आयोगाचे नियम बसवले धाब्यावर

ताजी बातमी ऑनलाईन टीम
उत्तर प्रेदशातील विधानसभा निवडणुकीतील ( UP Assembly elections 2022 ) प्रचाराचा पारा शनिवारी चढताना पहायला मिळाला. गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी कैराना मतदारसंघातील घराघरात जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी पत्रकांचे वाटप करत मतदारांचे आभार देखिल व्यक्त केले. पण या सगळ्यात त्यांनी कोरोना नियमांना फाट्यावर बसवले. प्रचार करताना त्यांनी मास्क लावला नाही तसेच सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवत कोरोना नियमावलींना केराची टोपलीच दाखवली.

निवडणूक आयोगाने फक्त पाचच लोकांना घराघरात जाऊन प्रचार करण्याची परवानगी दिली आहे. पण, अमित शाह ( Amit Shah ) यांनी मोठ्या लवाजम्यासह प्रचार करताना आढळले. यावेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्राना तैनात करण्यात आली होती. अमित शाह यावेळी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अनेक चिंचोळ्या गल्ल्यांतून प्रचार करत फिरले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखिल केली.

अमित शाह ( Amit Shah ) यांनी यावेळी अनेक लोकांशी संवाद साधला. देशाचे गृहमंत्री असून त्यांनी कोरोनाचे सर्व निर्बंधांना तोडत मोठ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार केला. शाह यांना पाहण्यासाठी देखिल नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे एकूणच यंत्रणेचा बोजवार उडालेला पाहण्यास मिळाला. गृहमंत्रीच प्रचारात अग्रेसर असल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीला एखाद्या उत्सवाच्या मिरवणुकीत बदलवून टाकले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -