Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाIPL 2022साठी या संघांनी या खेळाडूंना केले खरेदी, कोणला किती रक्कम मिळाली...

IPL 2022साठी या संघांनी या खेळाडूंना केले खरेदी, कोणला किती रक्कम मिळाली घ्या जाणून!


IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) अर्थात आयपीएल 2022च्या (IPL) हालचालींना वेग आला आहे. यासाठी संघांनी खेळाडू खरेदीस तयारी सुरु केली तर काही फ्रॅन्चायझीनं (Franchise) खेळाडू रिटेन (Retain) केले आहे. जाणून घेऊया कोणी कोणते खेळाडू रिटेन केले आणि कोणते खेळाडू (Players) लिलावात (Auction) नशीब अजमावणार आहेत…

यापूर्वी आठ संघांनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तर आता लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघांनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. यात लखनऊ संघाने केएल. राहुल, मार्क्स स्टोयनीस आणि रवी विष्णोई यांना करारबद्ध केले आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू रशीद खान आणि शुभम गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यानुसार 10 संघांनी लिलावाआधीच काही खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे.

मुबई इंडियन्स
रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह( 12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी).

चेन्नई सुपर किंग्ज
महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), रवींद्र जडेजा(16 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी).

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी).

दिल्ली कॅपिटल्स
रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी), अँनरीच नॉर्टीजे (6.50 कोटी).

सनराईजर्स हैदराबाद
केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरन मलिक (4 कोटी).

कोलकाता नाईट रायडर्स
आंद्रे रसल( 12 कोटी), वरून चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी ).

पंजाब किंग्ज
मयांक अग्रवाल (12 कोटी), अशदीप सिंह (4 कोटी).

राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी).

लखनऊ
केएल. राहुल (17 कोटी), मार्क्स स्टायनीस (9.2 कोटी), रवी विष्णोई (4 कोटी).

अहमदाबाद
हार्दिक पंड्या (15 कोटी), रशीद खान (15 कोटी), शुबमन गिल (8 कोटी).

कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे

पंजाब (PBKS) – 72 कोटी
हैदराबाद (SRH) – 68 कोटी
राज्यस्थान (RR) – 62 कोटी
लखनऊ (Lucknow) – 58 कोटी
बंगळरू (RCB) – 57 कोटी
अहमदाबाद (Ahmedabad) – 52 कोटी
मुंबई (MI) – 48 कोटी
चेन्नई (CSK) – 48 कोटी
कोलकाता (KKR) – 48 कोटी
दिल्ली (DC) – 47.5 कोटी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -