Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगविवाहितेचा छळ ; ९ जणांवर गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ ; ९ जणांवर गुन्हा दाखल


हुपरी येथे माहेरुन सोन्याचे दागिने व प्रॉपर्टीची मागणी करीत विवाहित महिलेला त्रास देणाऱ्या व शिवीगाळ करून मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पती अमोल मोहन माळी, सासरे ,मोहन महीपती माळी व सासु शोभा मोहन माळी (सर्व रा.विठ्ठल मंदीर जवळ कागलवेस हुपरी) यांच्यासह दीर, भावजया इतर नातेवाईक अशा ९ लोकांवर हपरी पोलिस ठाण्यात हंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. आई-वडिलांनी तुला सोन्याचे दागिने घातले नाहीत म्हणून शिवीगाळ करीत मारहाण करत होते चिकोडी साखर

कारखान्याचा शेअर्स नावावर करून दे, तुझ्या आईवडीलांच्या नावावर असलेली जुगूळ गावातील प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावला होता . शनिवारी हुपरी पोलिस ठाण्यात जाऊन पिडित विवाहिता विना अमोल माळी (वय २५ रा. विठ्ठल मंदीर जवळ कागलवेस् हुपरी) हिने पती अमोल मोहन माळी, सासरे ,मोहन महीपती माळी व सासु शोभा मोहन माळी दिर-अभिजीत मोहन माळी,भावजय आसावरी अभिजीत माळी व दिर-शितलकुमार मोहन माळी,जाऊ – सुप्रीया शितलकुमार माळी (सध्या रा.पुणे), पतीची आत्या शालन माळी व बाळासो माळी (रा. शिरोळ) व मामा बंडु माळी (रा. चौकाक) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -