ताजी बातमी ऑनलाईन टीम
सातारा नगरपालिका मधील नगरसेवकांचा कार्यकाल गेल्या महिन्यात संपला. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातार्यात इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. स्वच्छ आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय राहतील अशा नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार आहे. सातार्यात भाकरी फिरवली जाणार असल्याने 20 हून अधिक नगरसेवकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे.
सातारा नगरपालिकेची 2016 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन वॉर्डचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यामुळे प्रभागात दोन नगरसेवकांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली; मात्र निवडणुकीत वॉर्डचा प्रभाग झाल्यामुळे अनेकांची गोची झाली होती. प्रभागात विस्तीर्ण परिसराचा समावेश असल्यामुळे मतदारांशी संपर्क साधणे नगरसेवकांना जिकिरीचे झाले. शहराचा विकास व्हावा या उद्देशाने दोन वॉर्डचा एक प्रभाग झाला; मात्र सातार्यात विरोधाभास पाहायला मिळाला. नगरसेवकांकडून अपेक्षित कामकाज झाले नाही. नागरिकांच्या समस्या, मागण्यांबाबत टोलवाटोलवी झाली.
प्रभागातील दुसरा सहकारी नागरिकांची कामे करेल याच भूमिकेत बरेच नगरसेवक होते. याचा ताण काम करणार्या नगरसेवकांवर आला. काही प्रभागातील नगरसेवक निवडणूक झाल्यानंतर पुन्हा फिरकेलच नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रभागात काम करणार्या ठेकेदाराला टक्केवारीसाठी धमकावण्याचे प्रकारही झाले. सदर बझारमध्ये टक्केवारीसाठी नगरसेवकांमध्ये कळवंड झाली होती. टर्म संपली तरी काही नगरसेवकांना एकूण कार्यकालाइतकी कामेही प्रभागात करता आलेली नाहीत.
निम्म्या नगरसेवकांचे पत्ते होणार कट
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -




