Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रएका इशाऱ्यावर मुंबई थांबवण्याची होती ताकत! जाणून घ्या बाळासाहेबांचे काही खास किस्से

एका इशाऱ्यावर मुंबई थांबवण्याची होती ताकत! जाणून घ्या बाळासाहेबांचे काही खास किस्से


शिवसेना पक्षाची स्थापना करणारे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे (Bal Keshav Thackeray) होते. लोक त्यांना प्रेमाने बाळासाहेब ठाकरे म्हणत. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. बाळासाहेबांचे आयुष्य खूप रंजक राहिले आहे. सुरुवातीला व्यंगचित्रकार (Cartoonist) म्हणून एका वर्तमान पत्रात काम केले. त्यानंतर त्यांनी हिंदुत्व विचारधारेची (Hindutva ideology) संघटना ‘शिवसेने’ची (Shiv Sena) स्थापना केली. मराठी माणसाला न्याय आणि उत्तर भारतीयांवर होणारे हल्ले यावरून ते नेहमीच चर्चेत असत. बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवली नाही. पण तरीही त्यांना मोठमोठे राजकिय नेते, अभिनेते आणि खेळाडू भेटायला येत असत. त्यांच्या एका इशाऱ्यावर मुंबई (power to stop Mumbai) थांबायची. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलचे काही खास किस्से…

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी एक व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. फ्री प्रेस जर्नल (Free Press Journal) या इंग्रजी वृत्तपत्रापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर 1960 मध्ये आपल्या भावासोबत त्यांनी मार्मिक (Marmic) नावाचे साप्ताहिक सुरू केले. हे साप्ताहिक बाळासाहेबांच्या बोलक्या कार्टूनमुळे अल्पावधितच प्रसिद्ध झाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी नारळ फोडून एका संघटनेची स्थापना केली. त्यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनी या संघटनेला ‘शिवसेना’ (Shiv Sena) असे नाव दिले. संघटनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी बाळासाहेबांनी त्यांच्या ‘मार्मिक’मधून दसऱ्याला पहिला मेळावा (Dussehra Melava) शिवाजी पार्कवर घेण्याची घोषणा केली. मुंबईत अमराठी माणसांच्याच्या जाळ्यात अडकलेल्या मराठी माणसाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारीच बाळासाहेबांनी उचलली होती. मराठी माणसांच्या (Marathi people) मुद्द्यावर बोलणाऱ्या बाळासाहेबांनी काही काळातच मराठी माणसांच्या ह्रदयात स्थान मिळवले. शिवसेनेच्या पहिल्याच सभेला इतके लोक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जमले की मैदान देखील छोटे पडले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -