Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रदोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू

दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू


जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola Taluka) हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथे हॉटेलमधील वेटर्समध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा चक्क मृत्यू (Murder) झालाय. या धक्कादायक घटनेमुळे नाशिक जिल्हा (Nashik District) हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

वादाचे रुपांतर थेट हाणामारीत
मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील अंदरसुल गावजवळ स्वामीज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्समध्ये आपापसात वाद झाला होता. त्याचेच पर्यावसान थेट हाणामारीत झाले. वेटर्समध्ये सुरु झालेल्या या हाणामारीमध्ये एका चाळीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. मारहाणीमध्ये जखमी झाल्यामुळे या कामगाराला आपला जीव गमवावा लागलाय.

चार जणांना बेड्या ठोकल्या
या घटनेची माहिती होताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसे घटनास्थळाची पाहणी करुन पोलिसांनी जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चारही आरोपींना आरोपींना अटक केलं आहे. तसेच कामगाराच्या मृत्यूचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

पतीने केली पत्नीची हत्या, नंतर गळफास घेण्याचा प्रयत्न
दरम्यान, मुंबईमधील मालाड येथे घरगुती वादामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. तसेच पत्नीच्या हत्येनंतर पतीनेदेखील गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तानाजी कांबळ (30) आणि शीतल तानाजी कांबळे (25) अशी पती पत्नीची नावे आहेत. पती तानाजी कांबळेला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -