Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रनवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री

नवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री

नवजात बालकांना विकणारी टोळी चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चंद्रपूर आणि नागपूर येथून 5 महिलसह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी महिला नागपुरात नर्स म्हणून काम करत असल्याचंही धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय. चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात जन्म झालेल्या एका नवजात शिशूच्या आईला एचआयव्ही असल्याचे खोटे सांगून बाळाला दूर करण्यात आलं होतं. नागपुरातील एक स्वयंसेवी संस्था अशा वेगळ्या केलेल्या बाळाला सांभाळते, असा दावा नर्सनं बाळंत झालेल्या महिलेला केला होता. यानंतर दहा दिवसाचे बालक स्वतःपासून दूर गेल्याने संशय आलेल्या महिलेने पोलिसांना तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर अखेर या संपूर्ण टोळीचं बिंग फुटलंय. पोलिसांनी 2 लाख 75 हजार रुपयांत नवजात बाळ विकल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलंय. याप्रकरणी एकूण सहा संशयितांना अटक करण्यात आली असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांत नवजात बाळांच्या विक्रीप्रकरणी चंद्रपूरसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात अनेक प्रकरणं उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -