कर्नाटकात कोरोनाचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे. ही कामगिरी करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दुसरा डोसही 85 टक्के लोकांना देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रविवारी ही माहिती दिली. 18 वर्षांवरील सुमारे 4 कोटी लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
पत्रकारांशी बोलताना डॉ. सुधाकर म्हणाले, कोरोना लसीकरणामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटक आघाडीवर आहे. आरोग्य कर्मचारी, इतर कोरोना योद्धे, डॉक्टरांमुळे राज्यामध्ये पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह सर्व खात्यांतील अधिकार्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.
महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या व संसर्ग प्रमाण घटत आहे. आतापर्यंत कर्नाटकात एकूण 6 कोटी कोरोना चाचण्या केल्या आहेत. संपूर्ण देशात या बाबतीत कर्नाटक तिसर्या स्थानावर आहे.