Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनमी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून...

मी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप

बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर बिचुकलेंनी निशाणा साधलाय. ‘सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे’, असं म्हणत बिचुकलेंनी सलमानवर प्रहार केलाय. ‘सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावं मी दादा आहे’, असंही ते म्हणालेत.

तुम्हाला शोमधून बाहेर काढलं गेलं की तुम्ही बाहेर पडलात यावर बोलताना बिचुकले म्हणाले, ‘मी या शोमधून बाहेर पडणारच होतो. मला अशा शोची गरज नाहीये. मला त्यांनी थांबण्याची विनंती केली. त्यामुळे मी थांबलो. त्यांना माझी गरज होती, त्यांनी बोलावलं म्हणून मी बिग बॉसमध्ये गेलो.’

‘हिंदी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले होणार आहे म्हणून शांत आहे. एकदा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी खुलासा करेन’, असं बिचुकले म्हणाले. बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय हे जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

अभिजीत बिचुकले हे याआधी मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी केलेली विधानं चर्चेत होती. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. सध्या ते बिगबॉस हिंदीमध्ये सहभागी झाले होते. नुकतेच ते बिगबॉसच्या घराबाहेर पडले आहेत. आता त्यांनी बिग बॉसचं घर आणि सलमान खानवर आरोप केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -