Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महिलेचा चारचाकीत जळून मृत्यू

वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महिलेचा चारचाकीत जळून मृत्यू

गोविंदनगर येथील रहिवासी डॉ. सुवर्णा संदीप वाजे (वय-४०) यांचा मंगळवारी वाडिवऱ्हे परिसरात वाहनांमध्ये जळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.डॉ. सुवर्णा वाजे (रा. गोविंदनगर) या महापालिकेच्या सिडकोतील मोरवाडी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या परंतु सायंकाळी सहा वाजून गेल्यानंतरही त्या घरी आल्या नाही.

पती संदीप वाजे यांनी अंबड पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती. परंतु मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सुवर्णा वाजे यांचा त्यांच्या चार चाकी वाहनांमध्ये जळून मृत्यू झाल्याचे उघड झाले. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉक्टर वाजे यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -