Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीकोणाच्या बापाचं ऑफिस नाही; फडणवीसांचा संताप

कोणाच्या बापाचं ऑफिस नाही; फडणवीसांचा संताप

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना राज्य सरकारकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मंत्रालयात नगरविकास खात्यातील अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून फाईलींची छाननी करत असतानाचा सोमय्यांचा फोटो व्हायरल होत आहे. यावरुन सोमय्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नगरविकास खात्यातील अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारचे डोक फिरलं आहे. अण्णा हजारे यांनी केलेल्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार मिळाला आहे. या अधिकारानुसार कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा अधिकार सामान्य माणसाला आहे. त्याच अधिकाराचा वापर सोमय्यांनी बजावला, कागदपत्रे तपासताना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे. कोणाच्या मालकिचं ऑफिस नाही. मी जाणीवपूर्वक कोणाच्या मालकिचं ऑफिस नाही या शब्दाचा वापरत करत आहे. ही खासगी मालमत्ता आहे अशा शब्दात फडणीसांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -