Saturday, April 13, 2024
Homeनोकरीरेल्वे भरती : 2 ऑगस्ट पासून रेल्वे मध्ये भरती : 10 वी...

रेल्वे भरती : 2 ऑगस्ट पासून रेल्वे मध्ये भरती : 10 वी पासला मोठी संधी

ताजी बातमी /ऑनलाइन टीम

उत्तर मध्य रेल्वेने प्रशिक्षणार्थींच्या जागेसाठी अर्ज मागवले आहेत. दरम्यान, पात्र उमेदवार RRC NCR ची अधिकृत वेबसाइट rrcpryj.org द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही अर्ज प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर १ सप्टेंबर २०२१ रोजी संपणार आहे. या भरतीद्वारे १६६४ पदांची नेमणूक केली जाणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यामधील प्रशिक्षणार्थींना २०२०-२१ या सालासाठी उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.

पात्रता : यासाठी ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा १०+२ परीक्षा पद्धतीत दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

याचबरोबर ट्रेड वेल्डर, वायरमन आणि सुतार यांच्यासाठी मान्यताप्राप्त शाळेतून ८ वी पास किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. NCVT / SCVT द्वारे अधिसुचित केलेल्या ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र / ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे. वयोमर्यादा १५ वर्षे ते २४ वर्षे दरम्यान असावी.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. SC/ST/PWD/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क असणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -