Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : भडगाव फाटा येथे अपघात, एमआयडीसीतील कामगार ठार

कोल्हापूर : भडगाव फाटा येथे अपघात, एमआयडीसीतील कामगार ठार

निढोरी- कागल रस्त्यावर भडगाव फाटा येथे चारचाकीला दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एमआयडीसीतील काम करणार कामगार ठार झाला. वैभव शिवाजी धुरी (वय २५, रा दोनवडे, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, निढोरी- कागल रस्त्यावरून वैभव धुरी हा दुचाकी (एम एच ०९ ईपी १९१८) ने एमआयडीसीतून कामावरून घरी जात होता. याच दरम्यान त्याची दुचाकी भडगाव फाटा येथे आल्यावर त्याची चारचाकी (क्र. एमएच.० एएन१९५४) ला जोराची धडक दिली. या अपघातात वैभवच्या डोक्याला मार लागल्याने खूपच रक्तस्राव झाला. यानंतर त्याला मुरगूड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटला दाखल केले आहे. परंतु, येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी मुरगूड पोलिस ठाण्याचे स. पो. नि. विकास बडवे होते. आधिक तपास हेड कान्स्टेबल सतिश वर्णे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -