Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरनिपाणी : ब्रह्मदेवाची विशाळी यात्रा रद्द, भाविकांना दर्शनासाठी मनाई

निपाणी : ब्रह्मदेवाची विशाळी यात्रा रद्द, भाविकांना दर्शनासाठी मनाई

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र स्तवनिधी (ता. निपाणी) येथील ब्रह्मदेवाची वार्षिक विशाळी यात्रा रद्द करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार, यात्रा कमिटीने हा निर्णय घेतला आहे.

ब्रह्मदेवाची वार्षिक विशाळी यात्रा दि. १ ते २ फेब्रुवारी रोजी साजरी होणार होती. या काळात धार्मिक विधी व रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पोलिस प्रशासनाच्या आदेशानुसार, कोरोनामुळे यात्रेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. वरील काळात सर्व भाविकांना देवदर्शनासाठी मनाई करण्यात आली आहे.

तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या दुकानदारांनाही प्रवेश नाकारण्यात आला असून, सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कमिटीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -