मागील महिन्यात कर कमी करून सरकारने दारूचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला हाेता. दरम्यान राज्यात सध्या सुपर मार्केट, किराणा मालाचे दुकान याचबरोबर वॉक इन स्टोअरमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. वाईन विक्रीतून महसूल वाढविण्यासाठी सरकार हा निर्णय घेत आहे.
राज्य सरकार महसूलात वाढ करण्यासाठी नवा वाईन विक्रीचा प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावामुळे राज्याच्या महसुलात हजारो कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्याचा नवा वाईन प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाल्यास राज्यातील सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर आणि जनरल स्टोअरमध्ये वाईनची विक्री करण्यास परवानगी मिळणार आहे.