Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाआफ्रिकेत बेंचवर बसवलेल्या पुण्याच्या ऋतुराजवर राहुल-रोहित जोडी आता तरी विश्वास दाखवेल?

आफ्रिकेत बेंचवर बसवलेल्या पुण्याच्या ऋतुराजवर राहुल-रोहित जोडी आता तरी विश्वास दाखवेल?

वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केल्यामुळे या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या मालिकेसाठी काल संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी अनेक नवीन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे .यामध्ये मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खान, राजस्थानचा दीपक हुड्डा आणि लेग स्पिनर रवी बिश्नोई यांना संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सुद्धा आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सुद्धा ऋतुराज गायकवाडची संघात निवड करण्यात आली होती. पण त्याला तिन्ही वनडे सामन्यांमध्ये एकदाही संधी मिळाली नाही. ऋतुराज गायकवाड सलामीवीर आहे. पहिल्या वनडेमध्ये अनुभवी शिखर धवनला चान्स मिळाला. त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले व 79 धावांची खेळी केली. भारताकडून तिन्ही वनडे मॅचमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे सलामीला ऋतुराजला संधी मिळू शकली नाही.

वेंकटेश अय्यर फ्लॉप ठरल्यानंतर तरी ऋतुराजला संधी मिळेल, असे वाटले होते. पण त्याला चान्स मिळाला नाही. आता मायदेशात होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत तरी ऋतुराजला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. कारण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. येत्या सहा फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -