Friday, March 14, 2025
Homeसांगलीसांगली :वाटेगावात बिबट्या, बछड्याचे दर्शन

सांगली :वाटेगावात बिबट्या, बछड्याचे दर्शन

वाटेगाव (ता. वाळवा) येथील खोरी शिवारात ऊसतोड सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा बिबट्याची मादी व तिचा बछडा ऊसतोड मजुरांना दिसला. मजुरांची चाहूल लागताच तिथून बछड्याला सोडून त्याच्या आईने पळ काढला.

ऊसफड मालकाने माहिती वन विभागाला दिल्यानंतर प्राणीमित्र आणि वन विभागाने बछडा व त्याच्या आईची भेट घडवून आणली. नंतर ती मादी बछड्याला घेऊन गेल्याचा व्हिडीओ कॅमेराबद्ध झाला आहे.

काही महिन्यांपासून कासेगाव, वाटेगाव, भाटवाडी, शेणे, परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाळीव जनावरांना ठार करण्याच्या
घटना झाल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी खोरी शिवारातील वाटेगाव सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष शिवाजी गावडे व माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गावडे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची मादी व बछडा दिसला. गावडे यांनी याची माहिती वनविभागास दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -