Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रआंबा घाट बंद, अणुस्कुरा घाटाची वाट बिकट, करायचं काय?

आंबा घाट बंद, अणुस्कुरा घाटाची वाट बिकट, करायचं काय?

आंबा घाट बंद झाल्यानंतर राजापूर तालुक्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी अणुस्कुरा घाटाने आपली वाट मोकळी करून दिली; पण अडचणीत तारणहार ठरलेल्या अणुस्कुरा घाटावरच आता मरणकळा आली आहे. या घाटाची वाटही बिकट बनली आहे. सतत कोसळणार्‍या दरडी दरडावत आहेत. दरड कोसळली म्हणजे उपाययोजना केल्या जातात; पण दरडी कोसळूच नये म्हणून कायमस्वरूपी उपाय करण्याकडे शासनाचे दुर्लक्षच आहे.

आंबा घाट बंद झाल्यानंतर साडेसात कोटी रुपये दुरुस्तीसाठी मंजूर झाले; मात्र या घाटामध्ये कोणतेही काम अद्याप झालेले नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील पवसापासून ते विटा पेठेपर्यंत जाणारा मार्ग अणुस्कुरा घाटातून जातो. गेल्या जुलैमध्ये कोकणात झालेल्याआणि कोल्हापूरला जोडणार्‍या काही घाटांत भूस्खलन होऊन घाटमार्गे वाहतूक सेवा बंद पडली होती. आंबा घाटाचा त्यात समावेश होता. निसर्गाच्या दणक्यातून तेव्हाही अणुस्कुरा घाट सुटला होता. केवळ हा एकच घाट प्रवासासाठी सुरू राहिला. रत्नागिरी जिल्ह्यासह लगतच्या सिंधुदुर्गमधील बहुतांशी वाहतूक अणुस्कुरामार्गे सुरू राहिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -