Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगबूस्टर डोसबाबत केंद्र सरकार करणार फेरविचार; लवकरच घेणार मोठा निर्णय?

बूस्टर डोसबाबत केंद्र सरकार करणार फेरविचार; लवकरच घेणार मोठा निर्णय?

कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार लवकरच आपल्या धोरणावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस विशिष्ट वयोगटांना संरक्षण प्रदान करण्यात अपयशी ठरतेय, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. सध्या, कोरोना लसीचा बूस्टर डोस हेल्थकेअर वर्कर्स , फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिला जातो.

एका वेबासाईटच्या वृत्तात नमूद केल्याप्रमाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते ( according to senior officer) बूस्टर डोसबाबत पुन्हा विचार करावा लागेल. यावेळी काळजीपूर्वक विचार करून धोरणात बदल करत बूस्टर डोसचा पुनर्विचार करावा लागेल. तिसरा डोस देण्यात आलेल्या कोणत्याही देशांमध्ये तो फायदेशीर असल्याचं दिसून आले नाही. त्यामुळे आपण आंधळेपणाने कोणत्याही देशाच्या मार्गावर चालू शकत नाही. आम्हाला आमच्या स्थानिक तज्ज्ञांचं म्हणणं ऐकावं लागेल आणि आमचे निर्णय मूल्यमापनावर आधारित असतील, असंही अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -