Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रसातारा; शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा संघर्ष

सातारा; शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा संघर्ष

दुर्गम आणि डोंगराळ जावली तालुक्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय किनारी वसलेले खिरखंडी हे गाव. गावात जेमतेम पाचे ते सहा घरे. गावात राहणाऱ्या लोकांची संख्या जेमतेम पंधरा ते वीस. या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. मात्र, पुढील शिक्षणाची गावात सोय नसल्याने या गावातील मुली पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करून शिक्षण घेत असल्याचे पहायला मिळत आहे.

खिरखंडी हे गाव कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पलिकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा क्षेत्रात येते. येथील काही लोकांचे पुनर्वसन झाले, तर काही लोक आजही गावात राहात आहेत. गावात पाचवीपासून पुढील शिक्षणाची सोय नसल्याने या गावातील मुली स्वतः होडीचे सारथ्य करत अर्धा तास होडी व्हलवत खिरखंडी ते विनायकनगर शेंबडी मठ, असा नित्याचाच प्रवास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -