Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानPaytmने लाँच केले Pops Messenger, युजर्सला असा होणार फायदा!Paytmने लाँच केले Pops...

Paytmने लाँच केले Pops Messenger, युजर्सला असा होणार फायदा!Paytmने लाँच केले Pops Messenger, युजर्सला असा होणार फायदा!

डिजिटल पेमेंटमध्ये अग्रगण्य असलेल्या Paytmने पॉप्स मेसेंजर लाँच केले आहे. paytm ओनर One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने याबाबतची घोषणा केली आहे. यामुळे वापरकर्त्यांच्या गुंतवणूक आणि बाजाराची स्थिती ट्रॅक करण्याच्या पद्धतीत क्रांतीकारी बदल घडेल. पेटिएम मनीने लाँच केलेल्या पॉप्ससोबत वापरकर्त्यांना आपल्या स्टॉकसंबधी विशिष्ट माहिती जाणून घेता येणार आहे. यात पोर्टफोलियोबाबत विश्लेषण , बाजारातील घडामोडी आणि बाजाराचील महत्वाच्या हालचाली या सर्व गोष्टींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

हे प्लॅटफॉर्म स्टॉक शिफारसी, बातम्या आणि इतर सेवेसाठी मार्केटप्लेस म्हणून देखील कार्य करेल. पेटीएम मनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून शिफारशी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी कंपनीने डेली ब्रिफसोबत भागीदारी देखील केली आहे जी अनेक माध्यमांद्वारे बातम्या सुव्यवस्थित करते आणि प्रमुख टेकअवे सादर करते.

गेल्या काही वर्षात भारतीय बाजारपेठेत अनेक नव्या गुंतवणुकदारांचे आगमन झाले असून त्यांच्या हालचाली दिसून येत आहे. हे गुंतवणुकदार आपली गुंतवणूक शिकण्यासह ट्रॅक करू इच्छितात. मनी अ‍ॅपवर पॉप्सच्या सहाय्याने हे गुंतवणूकदार नियमितपणे आपले पोर्टफोलिओवर लक्ष ठेवत अलर्ट राहून बाजारातील बारकावे शिकू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -