Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगगारठा आणखी वाढणार, या राज्यात पावसासह बर्फवृष्टींचा अंदाज

गारठा आणखी वाढणार, या राज्यात पावसासह बर्फवृष्टींचा अंदाज

देशातील अनेक राज्यात गारठा आणखी वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे देशवासीय त्रस्त झाले आहेत. अशामध्ये आता देशातील अनेक राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘उत्तर- पश्चिम भारत , मध्य भारत, पूर्व भारत आणि मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट कायम राहील. या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडेल.’ त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील काही भागात पुढील दोन ते तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा आणखी वाढणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू आणि काश्मीर , लडाख , गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादमध्ये 29 ते 31 जानेवारी दरम्यान हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दुसर्‍या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. याशिवाय 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान मैदानी भागात हलका पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पंजाब , हरियाणा, चंदीगड , राजस्थान , पश्चिम उत्तर प्रदेश, विदर्भ बिहार आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. 28 ते 30 जानेवारी दरम्यान विलग भाग आणि ओडिशात थंडीची लाट राहिल. पुढील 24 तासांत मध्य प्रदेशातील निर्जन भागात तीव्र थंडीची लाट राहील. यादरम्यान मध्य प्रदेशातील विविध भागात थंड वारे वाहतील. त्याचसोबत पुढील 24 तासांत हिमाचल प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि विदर्भात आणि पुढील दोन दिवस उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी थंडी पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -