Thursday, September 19, 2024
Homeतंत्रज्ञानखूशखबर! प्रिपेड रिचार्जसाठी आता 30 दिवसांची व्हॅलिडिटी

खूशखबर! प्रिपेड रिचार्जसाठी आता 30 दिवसांची व्हॅलिडिटी

प्रिपेड ग्राहकांना 30 दिवसांची व्हॅलिडिटी असणारा किमान एक तरी प्लॅन उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत.

ट्रायन यासंदर्भात गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी किमान एक तरी असा प्लॅन उपलब्ध करावा, ज्याची कालमर्यादा (व्हॅलिडिटी) 30 दिवसांची असेल. वर्षभरात ग्राहकांकडून केल्या जाणार्‍या प्रिपेड रिचार्ज च्या संख्येत कपात होण्याच्या द‍ृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून कंपन्यांनी ग्राहकांना 30 दिवसांच्या कालमर्यादेचा प्लॅन व्हाऊचर, स्पेशल टेरिफ व्हाऊचर किंवा कॉम्बो व्हाऊचर उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी 60 दिवसांच्या आत करावी, असे निर्देशही ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, सध्या टेलिकॉम कंपन्या प्रिपेड ग्राहकांना 28 दिवसांच्या मुदतीचे प्लॅन ऑफर करतात. त्यामुळे एका वर्षात ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज करणे भाग पडते. या लुटीविरोधात अनेक ग्राहकांनी ट्रायकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत यात बदल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -