Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीकिराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल; आठवलेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल; आठवलेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

किराणा दुकानात आला दारुचा माल, आता लोकांचे होणार हाल… अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. मोठे सुपर मार्केट आणि किराणा दुकानात आता वाईन विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

सरकारच्या या परवानगीला भाजपाने विरोध केला आहे. तर आघाडीकडून या निर्णयाचे स्‍वागत केले. या सरकारला महाराष्ट्र मद्य राष्ट्र करायचे आहे का?, असा सवाल भाजपाकडून करण्यात आला आहे. तर दुकानात वाईन विक्रीला परवानगी मिळालयाने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळणार, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. एवढेच नाही तर मध्यप्रदेशात घरपोच वाईन पोहचवणार असलयाचे सत्ताधाऱ्यांकडून सांगत तेथे भाजपची चांगलीच कोंडी केली. यातच आता आठवलेंनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करणार असल्‍याचा इशारा सरकारला दिला आहे.

दरम्‍यान, राजभवनात पर्यावरण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळयाला रामदास आठवले उपस्थित होते. त्‍यानंतर माध्यमाशी बोलताना आठवले म्‍हणाले, ‘किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल…’ अशा काव्यमय ओळी म्‍हणत सरकारचा हा निर्णय अंत्‍यत चुकीचा आहे असे सांगितले. तसेच दारू आणि वाईन या एकाच प्रकारात येतात. तसेच अजित पवार यांचे म्हणणे चुकीचे आहे. आणि आता या निर्णयाच्या विरोधात आरपीआय आंदोलन करेल, असा इशारा ही त्‍यांनी यावेळी बोलताना दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -