Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानAndroid मोबाईल आणि iPhoneवर सुद्धा पाहू शकता लाईव्ह, असं डाऊनलोड करा हे...

Android मोबाईल आणि iPhoneवर सुद्धा पाहू शकता लाईव्ह, असं डाऊनलोड करा हे अ‍ॅप!

1 फेब्रुवारी 2022 ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी देखील हा अर्थसंपकल्प पेपरलेस असणार आहे. गतवर्षी कोरोनामुळे कागदपत्रांशिवाय अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी ओमायक्रॉनचं संकट असल्याने यावर्षीही त्याच पद्धतीने अर्थसंलकल्प मांडला जाणार आहे. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करतील. हा अर्थसंकल्प तुम्ही मोबाईल फोनवर देखील पाहू शकता. यासाठी अर्थसंकल्प मंत्रालयाने एक मोबाइल अ‍ॅप आणलं आहे. हे मोबाईल अ‍ॅप अ‍ॅड्रॉईड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

मोबाईल अ‍ॅपवर मिळणार अर्थसंकल्पाची माहिती –
अर्थसंकल्प 2022 संबंधी Union Budget App वर सर्व माहिती मिळणार आहे. या मोबाईल अॅपवर अर्थसंकल्पाचं पूर्ण भाषण तसंच महत्वाची कागदपत्रं उपलब्ध केली जाणार आहेत. हे अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे. युजर्स त्यांच्या आवडीप्रमाणे भाषा निवडू शकतात.

असं डाऊनलोड करा अ‍ॅप –
Union Budget App अँड्राईड आणि आयओएस दोन्हीकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करायचं असेल तर https://www.indiabudget.gov.in/ या वेबसाईटवर जा. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर उजव्या बाजूला डाऊनलोड मोबाईल अ‍ॅपचा पर्याय मिळेल. पर्यायवर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. येथे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जर तुम्ही अँड्रॉईड फोनचा वापर करत असाल तर Google Play Store वर क्लिक करा. तर आयफोन वापरणारे Apple App Store वर क्लिक करा. पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊ शकता. येथे तुम्हाला डाऊनलोड आणि इंस्टॉलचा पर्याय मिळेल. हे मोबाईल Android v5 आणि iOS v10 या किंवा त्यापेक्षा वरील व्हर्जन डिव्हाईसला सपोर्ट करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -