राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तसंच रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील शाळा सुरु करण्यास परवागी दिली होती. राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा 19 जानेवारीपासून सुरु झाल्या. पण पुण्यातील शाळा सुरु झाल्या नव्हत्या. पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. पण आता पुण्याच्या शाळा आणि कॉलेज सुरु होण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि कॉलेज सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील शाळा-कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार, अजित पवारांनी जाहीर केली नियमावली!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -