Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी ५०२ नवे रुग्ण ( ५ जणांचा मृत्यू ४४४२...

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी ५०२ नवे रुग्ण ( ५ जणांचा मृत्यू ४४४२ सक्रीय रुग्ण )

ताजी बातमी ऑनलाईन टी

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी २२६२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, यामध्ये ५०२ कोरोना बाधित आढळून आले तर कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात ५७१ जण कोरोनामुक्त झाले त्यामुळे कोरोनाचे सक्रीय रुग्ण ४४४२ इतके आहेत. श

निवारी दिवसभरात आढळून आलेल्या ५०२ बाधितांमध्ये आजरा-१०, भुदरगड -२, चंदगड-१, गडहिंग्जल-१०, गगनबावडा- ३, हातकणंगले३६, कागल-१३, करवीर-४१, पन्हाळा-१३, राधानगरी-१२, शाहुवाडी-४७ आणि शिरोळ तालुका-३० तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात-२०८, जयसिंगपूर नगरपरिषद-७, कुरुंदवाड नगरपरिषद-२, गडहिंग्लज नगरपरिषद-९, कागल नगरपरिषद-१, हुपरी नगरपरिषद३, मुरगुड नगरपरिषद-२ आणि अन्य जिल्ह्यातील २२ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख १७ हजार १८४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ६ हजार ९०२ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८४० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण ४४४२ इतके असून दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २८९ इतकी आहे.

इचलकरंजीत शनिवारी १८ रूग्ण

प्रशासनाकडून शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवे १८ रूग्ण आढळून आले. तर १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या १२९ सक्रीय रूग्णावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या अहवालानुसार षटकोण चौक ३, कागवाडे मळा, पाटील मळा, कापड मार्केट, आण्णारामगोंडा शाळा परिसरात भागात प्रत्येकी २ तर अवधुत आखाडा,मंगळवार पेठ, सहकारनगर, आमराई रोड, कलानगर, सुर्वेनगर, तेलगु सोसायटी भागात प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -