Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरशिरदवाडमधील घटना आगीत सायकल दुकान भस्मसात

शिरदवाडमधील घटना आगीत सायकल दुकान भस्मसात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील कै. कदम चौक परिसरात असलेल्या विजय जामदार यांच्या जामदार सायकल दुकानाला आग लागुन दुकानातील साहित्य जळुन भस्मसात झाले कदम चौक मुख्य रस्त्यानजीक विजय जामदार यांचे सायकल व टु व्हिलर गाड्यांचे टायर व ट्युब दुकान असुन त्या दुकानाला रात्री दोनच्या सुमारास आग लागली आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरातील युवक आणि नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला

परिसरातील लोकांना ही घटना समजताच लोकांनी इचलकरंजी नगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण केले पण दुकानातील टू व्हीलर गाड्याच्या टायर व ट्युबचा साठा असल्याने व त्याने पेट घेतल्याने आगीने रौद्र रुप धारण केले होते आणि इचलकरंजी नगरपालिका अग्निशामक घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळविले व आग आटोक्यात आणली दुकानातील सायकल ,सायकलचे स्पेअर्स पार्ट,टू व्हीलर गाड्यांचे टायर ट्युब तसेच अन्य साहित्य व दुकानाचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -