Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरज्योतिबा दर्शनासाठी तासाला आठशे भाविकांची मर्यादा

ज्योतिबा दर्शनासाठी तासाला आठशे भाविकांची मर्यादा

ताजी बातमी ऑनलाईन टीम


दख्खनचा राजा जोतिबा देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या
संख्येत मंगळवारी दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आता तासाला आठशे भाविक दर्शन घेवू शकणार आहेत.
ई-पास सुविधेचा भाविकांना लाभ होत आहे. कोरोना रुग्ण वाढल्यामुळे महालक्ष्मी, जोतिबा मंदिरातील दर्शन व्यवस्था क्षमता कमी करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रतितास चारशे भाविकांना दर्शनासाठी सोडले जात होते. त्यामध्ये आज बदल केला आहे. आता प्रति तास आठशे भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे दोन्ही मंदिरातील भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मागील रविवारी दर्शन पासच्या मर्यादेमुळे दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन झाले नव्हते. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर प्रवेशद्वार काही वेळ बंद केले होते. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून देवस्थान समितीने तासाला आता आठशे भाविक दर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -