Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रप्लास्टिक वापर करणारी दुकाने सीलबंद होणार

प्लास्टिक वापर करणारी दुकाने सीलबंद होणार

ताजी बातमी ऑनलाइन टीम


आजरा नगरपंचायतमार्फत कच-यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने महाराष्ट्र प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील वस्तूसह प्लास्टीक बंदी असणा-या ७५ Micron पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या (कॅरीबॅग), प्लास्टीकचे भाडे, वाटी, ताट, कप्स इ. वापरण्यास सक्त मनाई आहे. वरील नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच अशा आस्थापनांना अनिश्चित काळासाठी सीलबंद करण्यात येईल व त्यांचे नाहरकत दाखले रद्द करण्यात येतील.

दि. १ फेब्रुवारी नंतर आजरा नगरपरपंचायत मार्फत प्लास्टीक बंदीबाबत तपासणी करणेत येणार असून ज्यांच्याकडे प्लास्टीक बंदी अंतर्गत असणा-या वस्तू आढळूण येतील, त्याचेवर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी. आजरा शहर प्लास्टीक मुक्त करणेसाठी सर्व व्यापारी बंधू, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -