Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरमद्यपान हानिकारकच;’ आम्ही वाईन प्या, असं म्हणणार नाही..!

मद्यपान हानिकारकच;’ आम्ही वाईन प्या, असं म्हणणार नाही..!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आम्ही कुणाला वाईन प्या, असे म्हणू शकत नाही, आणि म्हणणारही नाही, सिगारेटवरती देखील धोक्याची सूचना लिहिलेली असते, तसंच मद्यपान हानिकारकच आहे. असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सोलापुरात केलं आहे.

सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन (Wine) विकण्याची परवानगी दिली आहें मात्र यावरुनच आता राजकारण चांगलच तापलं आहे. सरकारच्या या निर्णयाला भाजपने (BJP) विरोध केला आहे. तर सरकारने या निर्णयाचं समर्थन केलं आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र करायचं आहे का?, असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. तर, वाईन विक्रीला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल असा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.

असं वाईन वरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरु असतानाच आणि तुम्ही तरुणाईला व्यसनाच्या आहारी घालवणार का ? असे प्रश्न विरोधक आणि सामान्य जनता उपस्थित करत असताना याबाबतीत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे.

मद्यपान हानिकारकच –

‘आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, आणि म्हणणारही नाही. सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच त्यामुळे जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात, मद्यपान हानिकारक आहेच त्याविषयीची जागृती आपण करत असतो’ असं वक्तव्य (minister of health)आरोग्य मंत्री यांनी सोलापुरात (Solapur) केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -