ताजी बातमी ऑनलाइन टीम
प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये सुख-शांती असावी अशी इच्छा असते. जुन्या काळामध्ये अनेक वेळा वडिलधारे लोक घरामध्ये काही गोष्टी करणे टाळण्यास सांगत होते. कारण घरामध्ये सुख-शांती आणि लक्ष्मीचा वास हवा असेल तर आपण काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे.
पूर्वीच्या काळी घरामध्ये एक खास जागा असायची आणि त्याच ठिकाणी घरातील सर्व सदस्य मिळून जेवण करत असायचे. मात्र, आता सध्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की, लोक बेड, सोपा, हाॅल, बाल्कनी किंवा दरवाज्यामध्ये बसून जेवण करतात. मात्र, असे करणे टाळाच कारण असे केल्याने लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते.
बऱ्याच वेळा लहान लेकरांना घराच्या चाैकटीवर बसून जेवू घातले जाते. मात्र, असे करणे टाळा. कधीही जेवण चाैकटीवर बसून करू नये.
घराच्या चौकटीसमोर बऱ्याच वेळा शूज आणि चप्पल ठेवल्या जातात. यामुळे कुटुंबात पैशाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून चौकटीच्या बाहेर चप्पल ठेवू नका.
आजकाल लोकांना बाहेरून आल्यावर बेडवर बसून जेवण करण्याची सवय झाली आहे. मात्र, असे करू नका. यामुळे घरामध्ये पैसांची चणचण भासण्याची शक्यता आहे. नेहमी जेवण करताना किचनमध्येच बसून करा.