Wednesday, February 5, 2025
Homeतंत्रज्ञानAirtel, Jio की Vi? 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन देतो सर्वाधिक?

Airtel, Jio की Vi? 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन देतो सर्वाधिक?

ताजी बातमी ऑनलाइन टीम

देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या Jio , Airtel आणि Vodafone Idea त्यांच्या वापरकर्त्यांसाठी 1 दिवसापासून ते 365 दिवसांची वैधता असलेले असंख्य प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. जर तुम्हाला स्वतःसाठी मासिक प्लॅन घ्यायचा नसेल आणि एक वर्षाचा मोठा प्लॅन देखील नको असेल तर 84 दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनचे बेनिफिट्स हे बहुतांश वापरकर्त्यांच्या गरजा भागवतात. देशातील तीन नेटवर्क कंपन्या Airtel, Jio आणि Vodafone Idea भारतात 84-दिवसांचे प्रीपेड प्लॅन ऑफर करतात ज्यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि मोफत एसएमएससह डेटा मिळतो.

एअरटेलचा 455 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : एअरटेलच्या 455 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 6GB डेटा येतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये एकूण 900 फ्री SMS दिले आहेत. तसेच प्लॅनमध्ये Prime Video Mobile Edition एडिशन सबस्क्रिप्शन 1 महिन्यासाठी दिले जाते. या व्यतिरिक्त Apollo 27/7 Circle, Shaw Academy कडून मोफत ऑनलाइन कोर्सेस, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि मोफत Wynk म्युझिक या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते.

एअरटेलचा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : एअरटेलच्या 719 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. एसएमएससाठी, या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे सबस्क्रिप्शन 1 महिन्यासाठी उपलब्ध आहे. सोबतच Apollo 27/7 Circle, Shaw Academy कडून मोफत ऑनलाइन कोर्सेस, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि मोफत Wynk म्युझिक या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते

एअरटेलचा 839 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : एअरटेलचा 839 रुपयांचा रिचार्ज प्लॅन दररोज 2GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. तसेच दररोज 100 फ्री एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे 1 महिन्यासाठी सबस्क्रिप्शन,सोबतच Apollo 27/7 Circle, Shaw Academy कडून मोफत ऑनलाइन कोर्सेस, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि मोफत Wynk म्युझिक या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -