ताजी बातमी ऑनलाइन टीम
आत्तापर्यंतचे सर्व सीजन (season) वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरले असल्याचे आपण पाहिले. तसेच तिथं गेलेल्या प्रत्येक स्पर्धेकाला किती प्रसिध्दी मिळाली हे सुध्दा आपल्याला कळले. तसेच तिथं गेल्यामुळे अनेक सेलिब्रिटीचं (celebrity) वागणं प्रत्यक्षात कसं असतं हे सुध्दा कळलं असावं. लोकांचा आवडता शो म्हणून बिग बॉस कडं पाहिलं गेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत त्याचे 15 सीजन पुर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजन हा राजनिती, कलाकार, सामान्य माणूस असं सगळा गोतावळा घेऊन केला जातो. जे लोकांना माहिती आहेत किंवा त्याची काहीतरी वेगळी स्टोरी आहे. बिगबॉसचा पहिला सीजन सोनी टिव्हीवरती पाहायला मिळाला होता. त्यानंतर हा कार्यक्रम कलर्स टिव्हीने खरेदी केला.
बिग बॉस म्हणजे नेमकं काय ?
तुम्ही आत्तापर्यंत बिग बॉसमधील भांडण पाहिली असतील किंवा पाहत असाल कारण त्यासाठी हा शो खूप फेमस आहे. त्यामध्ये 14 ते 15 स्पर्धेत असतात. ते राजकारण, सामान्य, कलाकार असे स्पर्धेक असतात. तिथं एकदा गेल्यानंतर तुमचा बाहेरच्या लोकांशी अजिबात संपर्क होत नाही. प्रत्येक आठवड्याला एकाला त्या शोमधून बाहेर पडावं लागतं. हा खेळ सुरू झाल्यानंतर लोकांच्याकडून वोटींग करून घेतलं जातं. ज्याला वोट कमी मिळतील अशा स्पर्धेकाला त्यातून बाहेर पडावं लागतं. घरात तुम्हाला अनेक कॅमे-यासोबत राहावं लागतं. म्हणजे घरात सगळीकेडे अनेक कॅमेरे लावले असतात. तिथं तुम्हाला प्रत्येकवेळी टास्क दिला जातो. त्यामध्ये तुम्ही काय करताय हे प्रेक्षकांना दाखवलं जातं. त्यातून प्रेक्षक तुम्हाला विजेता ठरवतात. जो स्पर्धेक जिंकतो, त्याला चषक आणि ट्रॉफी दिली जाते.
बिग बॉसचे आजवरचे विजेते
सीजन 1 – राहुल रॉय (Rahul Roy)
सीजन 2 – आशुतोष (Ashutosh)
सीजन 3 – विन्दु दारा सिंह (Vindu Dara Singh)
सीजन 4 – स्वेता तिवारी (Sweta Tiwari)
सीजन 5 – जूही परमार (Juhi Parmar)
सीजन 6 – उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia)
सीजन 7 – गौहर खान (Gauhar Khan)
सीजन 8 – गौतम गुलाटी (Gautam Gulati)
सीजन 9 – प्रिंस नरूला (Prince Narula)
सीजन 10 – मनवीर गुर्जर (Manveer Gurjar)
सीजन 11 – शिल्पा शिंदे (Shilpa Shinde)
सीजन 12 – दीपिका कक्कड़ (Dipika Kakar)
सीजन 13 – सिध्दार्थ शुक्ला (Siddharth Shukla)
सीजन 14 – रुबीना दिलैक (rubina dilaik)
बिग बॉस सीजन 15 चा विजेता कोण आहे हे ठरणार आहे. त्यामुळे त्याचंही नाव या यादीत समाविष्ठ होईल
बिग बॉसचे आजवरचे विजेते कोण आहेत? वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी ( बिग बॉस म्हणजे नेमकं काय ? )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -