Monday, December 23, 2024
Homeक्रीडाIPL 2022: बीसीसीआय उचलणार मोठं पाऊल, चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहता येणार?

IPL 2022: बीसीसीआय उचलणार मोठं पाऊल, चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहता येणार?

ताजी बातमी ऑनलाइन टीम

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा होणाऱ्या आयपीएल (Indian Premier League 2022) दरम्यान प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. भारतात होणाऱ्या या T20 लीग दरम्यान बीसीसीआय कोरोना (coronavirus) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथिलता देत 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी देण्याचा विचार करत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बीसीसीआयने (BCCI) संपूर्ण आयपीएल स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये प्लेऑफ सामने (Playoff match) आयोजित केले जाऊ शकतात. तत्पूर्वी, 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मेगा-लिलाव आयोजित करण्याची बीसीसीआयची योजना आहे

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी प्लॅन-बी (BCCI Plan-B) म्हणून यूएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यावर्षी आयपीएल भारतातच आयोजित करण्याला बीसीसीआयचे प्राधान्य आहे. भारतात कोरोना विषाणूची (covid-19) नवीन लाट आली नाही तर बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा मुंबईच्या वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (Cricket Club of India) आणि पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये (Maharashtra Cricket Stadium) महाराष्ट्र सरकारशी परस्पर बोलणी करून आयोजित करण्याचा विचार करत आहे.

कोरोना व्हायरस नियंत्रणात राहिल्यास महाराष्ट्र सरकार 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात बसवण्यास बीसीसीआयला परवानगी देऊ शकते असे सांगण्यात येत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या कसोटी मालिकेतील मुंबईत खेळल्या गेलेल्या सामन्यांत 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -