Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगराज्यात आणखी दोन दिवस कडाक्याची थंडी

राज्यात आणखी दोन दिवस कडाक्याची थंडी

ताजी बातमी ऑनलाईन टीम


पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे.

मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील थंडीचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान केंद्राने वर्तवला आहे. दरम्यान मुंबईत आज रविवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तसेच पुण्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या बरोबरच, नागपुरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पुढील महिन्यात, अर्थात फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मुंबईतील हवामान केंद्राने वर्तवली आहे. या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -