ताजी बातमी ऑनलाईन टीम
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील नव्या वर्षातील पहिल्याच उत्तरायण किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मावळतीच्या किरणांनी जगदंबेच्या मुर्तीस सोनेरी अभिषेक केला. हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात वर्षातुन दोन वेळा तीन दिवसांचा किरणोत्सव सोहळा होतो.कधी ढगाळ तर कधी कृत्रिम अडथळे येत असले तरी अलिकडे तीन चार वर्षांत पुर्णपणे हा किरणोत्सव सोहळा पाहण्याचे भाग्य भाविकांना लाभले होते. नोव्हेंबर मध्ये मावळत्या सूर्याची किरणे मुर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली होती. तसेच किरणोत्सव पुर्ण क्षमतेने होण्याची चिन्हे असताना,ढगाळ वातावरणाचा अडथळा झाला होता.
यंदा नव्या वर्षातील पहिलाच किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी सुर्यकिरणांनी जगदंबेच्या मुर्तीसह संपुर्ण गाभारा उजळला. महाद्वार चौकामध्ये सायंकाळी ५.३२ वाजता सुर्यकिरणे पोहोचली तेव्हा त्यांची तिव्रता अपेक्षीत होती. तसेच हवामानही स्वच्छ होते तर ढगांचाही अडथळा नव्हता. सुर्यकिरणे सहजरीत्या सायंकाळी ६.८ वाजता चांदीच्या उबंऱ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता किरणांनी मुर्तीच्या चरणांना स्पर्श केला. कंबरेच्या वर सरकत पुढे ६.१८ वाजता सुर्यकिरणे मूर्तीच्या मुखकमलावर चमकली आणि किरीटावर लुप्त झाली.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईला सुर्यकिरणांचा पुर्ण अभिषेक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -