Tuesday, December 24, 2024
Homeआरोग्यमागील २४ तासात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढल्याने दिलासा

मागील २४ तासात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढल्याने दिलासा

देशात मागील २४ तास कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. देशात मागील २४ तासात 2लाख 09 हजार 918 नव्या केसेसची नोंद झाली, तर 959 मृत्यूची नोंद झाली. दिलासादायक चित्र म्हणजे दिवसभरात 2 लाख 62 हजार 628 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १८ लाख ३१ हजार २६८ वर गेली आहे. देशातील पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढला असून तो 15.77% झाला आहे. देशात आतापर्यंत 1,66,03,96,227 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, अनेक राज्यातील परिस्थिती सुधारत असून सदर राज्यांनी प्रतिबंध हटविण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक सरकारने बहुतांश प्रतिबंध हटविण्याचा निर्णय शनिवारी घेतला होता. आजपासून येथील रात्रीची संचारबंदी देखील रद्द केली जात आहे. शाळाही उघडण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -