Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रदोन आयशर ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात ४ ठार

दोन आयशर ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात ४ ठार

दोन आयशर ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 35 जण गंभीर जखमी झाल्याची घटना 30 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही घटना नागपूर-मुंबई महामार्गावरील तालुक्यातील शिवराई गावाजवळ घडली. मृतांमध्ये दोन महिलांसह 17 वर्षीय युवती व एका 8 वर्षीय मुलीचा समावेश आहे. मृत व जखमी हे नाशिक येथील अंबड परिसरातील रहिवासी आहेत.

कविता आबासाहेब वडमोर(45), प्रज्ञा गौतम गायकवाड (17), मोनू दीपक वाव्हळे (8) व ललिता पुंडलिक पवार (45) सर्व रा. अंबड, गौतमनगर, नाशिक अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकमधील अंबड इथले नागरिक आयशर ट्रकमधून लग्नासाठी जालना जिल्ह्यातील मंठा येथे गेले होते. लग्नसमारंभ झाल्यावर पुन्हा नाशिककडे ते परतत होते. त्यावेळी वैजापूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू आयशर ट्रकला समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघेजण ठार तर जवळपास 35 जण गंभीर जखमी झाले. यातील तिघेजण कविता वडमोर, प्रज्ञा गायकवाड व मोनू वाव्हळे या तिघी जागीच ठार तर ललिता पवार ही महिला नाशिकला उपचारासाठी नेत असताना गतप्राण झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -