चर्चेतील असणारा कार्यक्रम म्हणजे, बिग बॉस. यावर्षीचा बिग बॉसच्या १५ व्या सिझनची विनर ठरली आहे तेजस्वी प्रकाश. फिनालेमध्ये तेजस्वी आणि प्रतीक या दोघांमध्ये स्पर्धा होती. दोघांपैकी कोण होणार बिग बॉसच्या १५ चा विजेता? याबद्दल सर्वांना उत्सूकता लागून राहीली होती. आणि टॉप तीनमधील करण कुंद्राआणि प्रतीक सहजपाल यांना टक्कर देत तेजस्वी प्रकाशने बाजी मारली. प्रतीक सहजपाल उपविजेता ठरला. तेजस्वीला बिग बॉस ट्रॉफीसह ४० लाख रुपये मिळाले आहेत. तसेच ‘नागिन ६’ या मालिकेत लीड रोल मिळाला आहे.
बिग बॉसच्या १५ व्या सीझनच्या प्रवासातील करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री चांगलीच चर्चेत होती. दोघांचाही फॅन वर्ग खूप आहे. या दोघांच रिलेशन असचं राहणार का याची चाहत्यांना उत्सूकता लागून राहिली आहे.