Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगपरीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी; हिंदुस्तानी भाऊच्या सांगण्यावरून १०-१२ वीचे विद्यार्थी रस्त्यावर

परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी; हिंदुस्तानी भाऊच्या सांगण्यावरून १०-१२ वीचे विद्यार्थी रस्त्यावर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्‍धतीने घ्‍या, अशी मागणी करत आज दुपारी राज्‍याच्‍या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्‍या निवासस्‍थानासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यानंतर अवघ्‍या काही मिनिटांमध्‍ये मुंबईसह नागपूर, ओरंगाबाद, उस्‍मानाबाद येथे विद्‍यार्थी रस्‍त्‍यावर उतरले. अचानक झालेल्‍या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

हिंदुस्‍थानी भाऊची आंदाेलनासाठी फूस ?
वर्षभर शाळा व महाविद्‍यालये ऑनलाईन पद्‍धतीने घेण्‍यात आले आहे. यामुळे परीक्षा ऑनलाईन पद्‍धतीने घेण्‍यात यावा, अशी मागणी करणारा यूट्‍यूबर विकास पाठक उर्फ हिंदुस्‍थानी भाऊ याचा व्‍हिडीओ व्‍हायरल झाला होता. त्‍याने केलेल्‍या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन केल्‍याचे विद्यार्थ्यांनी वृत्तवाहिनीतला सांगितले. धारावी येथे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्‍या निवासस्‍थानासमोर विद्‍यार्थी एकत्र आले. जोरदार घोषणाबाजी करत ऑनलाईन परीक्षा घेण्‍याची माहिती दिली.

आफॅलाईन परीक्षा घेण्‍यात येवू नयेत, तसेच सर्व फी माफ करण्‍यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देणार आहे, असे हिंदुस्‍थानी भाऊ याने आपल्‍या व्‍हिडीओमध्‍ये म्‍हटलं आहे. मागण्‍या मान्‍य न केल्‍यास राज्‍यात सर्वत्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्‍याने या व्‍हायरल झालेल्‍या व्‍हिडीओमधून दिला आहे. सध्‍या पाेलिस या हिंदुस्‍थानी भाऊचा शाेघ घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -