रस्ता रुंदीकरणाच्या गोंडस नावाखाली कवठेमहांकाळ जवळील सलगर प । स न कर्नाटकातील बोरगाव जवळील पाचवा मैल पर्यत चा नृसिंहवाडी मार्गे तयार होणारा रस्त्याचे काम प्रगतीपथावर आले असून शिरोळ नृसिंहवाडी रस्त्यावरून सैराट वाहने धावत आहेत. या मार्गावर दिशा दर्शक फलक स्पिड ब्रेकर तसेच रस्ता दुभाजक पांढरे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवासी वर्गा कडुन होत.
जुलै मध्ये आलेल्या महापूराच्या आधीपासून या रस्त्याचे रुंदीकरण सुरू असुन या मार्गावर असणाऱ्या शंभर वर्षांपूर्वीच्या हजारो झाडांची तोड करण्यात आली होती महापूरा मुळे थोडे काम रखडले होते तरी काही दिवसांपूर्वी हे काम संथगतीने सुरू होते या मार्गावर अनेक प्रवासी मोटारसायकल चारचाकी वाहनाने नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेण्यासाठी येत असतात तसेच नोकरदार वर्ग ही प्रवास करत आहे या मार्गावर काही दिवसांपूर्वी एकेरी वाहतूक सुरू होती व खडी पसरली होती.
या मुळे वहातुकीची कोंडी होत होती. खडीमुळे अनेक दुचाकी घसरून पडत होत्या. अद्याप ही वाहतूक कोंडी होत आहे हा रस्ता नृसिंहवाडी पर्यंत पुर्ण झाला आहे. या गुळगुळीत रस्तावर शिरोळ नृसिंहवाडी रस्त्यावर चारचाकी दुचाकी घेऊन येणारे भाविक व ईतर वाहन धारक आपली वहाने सैराट पणे चालवत असुन या मार्गावर दिशादर्शक फलक स्पिड ब्रेकर तसेच रस्ता दुभाजक पांढरे पट्टे मारणे गरजेचे बनले आहे. याचे मार्गावर नृसिंहवाडी मधील अनेक ग्रामस्थ पहाटे सायंकाळी फिरायला जात असतात थंडीमुळे पडणारे धुके या मुळे न दिसणारा रस्ता यामुळे भविष्यात मोठे वाहन अपघात व्हायची शक्यता आहे.